Pranali Kodre
९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे आशिया कप २०२५ स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा ही स्पर्धा टी२० प्रकारात खेळवली जाणार आहे.
आशिया कप स्पर्धा १९८४ साली सुरू झाली. तेव्हापासून अनेक वर्षे वनडे प्रकारात ही स्पर्धा खेळवली जात होती. पण गेल्या काही वर्षांपासून आगामी आयसीसी स्पर्धांच्या दृष्टीने कधी वनडे, तर कधी टी२० स्वरुपात ही स्पर्धा होते.
आशिया कपमध्ये (वनडे आणि टी२० मिळून) सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. पण या यादीत एक भारताचा आणि एक बांगलादेशचा खेळाडू आहे. या यादीतील टॉप - ५ गोलंदाजांबद्दल जाणून घ्या.
श्रीलंकेच्या अजंता मेंडिसने आशिया कप स्पर्धेत ८ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशच्या शाकिब अल हसनने आशिया कप स्पर्धेत २५ सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताच्या रवींद्र जडेजाने आशिया कप स्पर्धेत २६ सामन्यांत २९ विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरने आशिया कप स्पर्धेत २४ सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने आशिया कप स्पर्धेत १५ सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत.