Pranali Kodre
२०२४ वर्षाचा शेवट झाला आहे. त्यामुळे या वर्षातील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले आहे.
साल २०२४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजही निश्चित झाले आहेत.
२०२४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर अर्शदीप सिंग आहे. त्याने २० सामन्यांत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर प्रत्येकी ४० विकेट्ससह संयुक्तरित्या मोहम्मद सिराज (३४ डाव) आणि वॉशिंग्टन सुंदर (२३ डाव) आहेत.
साल २०२४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. त्याने ११ सामन्यांतील २१ डावात ४७ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून २०२४ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आहे. त्याने २० सामन्यांतील २८ डावात ४९ विकेट्स घेतल्या आहेत.
साल २०२४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर जसप्रीत बुमराह असून त्याने २१ सामन्यांतील ३४ डावात ८६ विकेट्स घेतल्या आहेत.