Pranali Kodre
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही भारत आणि इंग्लंड संघात झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
या मालिकेत दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांद्दल जाणून घेऊ.
पाचव्या क्रमांकावर प्रसिद्ध कृष्णा असून त्याने ३ सामन्यांत ६ डावात गोलंदाजी करताना १४ विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर असून त्याने ३ सामन्यांतील ५ डावात गोलंदाजी करताना १४ विकेट्स घेतल्या. यातील दोन डावात त्याने ५-५ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ४ सामन्यातील ८ डावात गोलंदाजी करताना १७ विकेट्स घेतल्या.
जोश टंग दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ३ सामन्यांतील ६ डावात गोलंदाजी करताना १९ विकेट्स घेतल्या.
भारताचा मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर असून त्याने ५ सामन्यांतील ९ डावात गोलंदाजी करताना २३ विकेट्स घेतल्या.