Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नंसीच्या जोरदार चर्चा आहेत.
अशातच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये भन्नाट रील शेअर केली आहे.
सासू आणि आईला सोनाक्षीच्या गुड न्यूजची प्रतीक्षा असल्याचं या रीलमधून स्पष्ट होतंय.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सहा महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली.
लग्न झाल्यापासून हे दोघं सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत.
सध्या सोनाक्षी आणि झहीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.
या ट्रिपचे बरेच फोटो आणि व्हिडीओ दोघं सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.