घरात सासू-सुनेचे भांडणं होतात? करा 'हे' उपाय, कायमची डोकेदुखी होईल दूर...

Shubham Banubakode

वादामागचं कारण शोधा

सासू-सुनेतील वाद बहुतेक वेळा अपेक्षा, अधिकार, जबाबदाऱ्या किंवा गैरसमजांमुळे होतात. त्यामुळे या वादामागचं खरं कारण समजून घ्या.

mother in law daughter in law conflict

|

esakal

संवाद साधा

दोघींशीही थेट, शांत आणि आदराने संवाद साधा. टोमणे, तुलना किंवा जुन्या गोष्टी उकरून काढणं टाळा.

mother in law daughter in law conflict

|

esakal

जबाबदाऱ्या वाटून द्या

कोण काय निर्णय घेणार, घरकामाची जबाबदारी कोणाची? हे स्पष्ट करा. त्यामुळे गैरसमज कमी होतील.

mother in law daughter in law conflict

|

esakal

संयम ठेवा

दोघींना एकमेकींशी जुळवून घ्यायला वेळ द्या. लगेच सगळं बदलेल अशी अपेक्षा करू नका. संयम ठेवा.mother in law daughter in law conflict

mother in law daughter in law conflict

|

esakal

दोघींना आदर द्या

दोघांनाही आदर द्या. आदर दाखल्याने मन जुळतील. सकारात्मक बदल दिसून येईल.

mother in law daughter in law conflict

|

esakal

मध्यस्थी करा

दोघींना सारखं महत्त्व देत समतोल राखा. दोघींमध्ये मध्यस्थी करणं महत्त्वाचं आहे.

mother in law daughter in law conflict

|

esakal

वाद टाळण्याचा प्रयत्न करा

दोघींना योग तसेच स्वतःसाठी वेळ काढायला सांगा. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि वाद टाळता येईल.

mother in law daughter in law conflict

|

esakal

नातं टिकवण्याचा प्रयत्न करा

भांडणात कोण जिंकलं त्यापेक्षा नातं टिकवणं महत्त्वाचं आहे. समजूतदारपणे निर्णय घेतल्यास घरात आनंदाचं वातावरण राहू शकतं.

mother in law daughter in law conflict

|

esakal

घरच्यांकडून लग्नाचा दबाव आहे का? वाचा काय करायचं

Facing family pressure to get married? Here are practical steps

|

esakal

हेही वाचा -