Monika Shinde
आई... दोन अक्षरांचा हा शब्द, पण त्यामागे एक संपूर्ण विश्व लपलेलं आहे. जिच्यामुळे आपलं अस्तित्व आहे.
तिच्यासाठी काहीही केलं तरी ते नेहमीच अपुरं वाटतं. या खास दिवशी, तिला द्या काही हटके आणि प्रेमाने भरलेली गिफ्ट्स ज्या पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलून येईल!
जर आईला फोटो काढायला आवडत असेल, तर जुने फोटो, पत्रं आणि कोट्स असलेली एक सुंदर फोटो फ्रेम गिफ्ट करा. हे तिच्या आठवणी जपण्यास मदत करेल.
आई दिवस रात्र काम करून थकत असते म्हणून एक दिवस तिला रिलॅक्स वाटण्यासाठी स्पा वाउचर गिफ्ट करा जेणे करून तिचा थोडा फार थकवा दूर होईल
आईला प्रत्येक साडीवर मॅचिंग पर्स आवडत असेल तर एक न्यू स्टाईल पर्स गिफ्ट द्या
आई सतत घर, काम आणि जबाबदाऱ्या यामध्ये गुंतलेली असते. अशा वेळी एक स्टायलिश डिजिटल घड्याळ तिच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरेल. यामध्ये वेळ पाहण्यासोबतच अलार्म, तारीख, फिटनेस ट्रॅकिंग अशा अनेक सुविधा असतात.
मदर्स डेच्या दिवशी आईला बाहेर फिरायला किंवा आवडत्या ठिकाणी जेवायला घेऊन जा, ती नक्कीच आनंदी होईल