आजच्या दिवशी केला गेला, जगातील पहिला 'मोबाईल' कॉल

Sudesh

मोटोरोला

जगातील पहिला मोबाईल फोन बनवणारी कंपनी म्हणून मोटोरोलाची (Motorola) ओळख आहे.

first mobile phone call Motorola | eSakal

कॉल

3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोलाच्या अभियंत्याने जगातील पहिला मोबाईल फोन कॉल केला होता.

first mobile phone call Motorola | eSakal

इंजिनिअर

मार्टिन कूपर असं या इंजिनिअरचं नाव आहे. त्यांनी बेल लॅब्सचे जोएल एंगेल यांना मोबाईलवरुन फोन केला होता.

first mobile phone call Motorola | eSakal

बेल लॅब्स

विशेष म्हणजे, बेल लॅब्स ही तेव्हाची मोटोरोलाची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी होती.

first mobile phone call Motorola | eSakal

मोबाईल

मोटोरोलाच्या पहिल्या मोबाईलचं नाव Motorola DynaTAC 8000X असं होतं.

first mobile phone call Motorola | eSakal

वजन

हा मोबाईल सुमारे एक फूट मोठा फोन होता, आणि याचं वजनही सुमारे 800 ग्रॅम होतं.

first mobile phone call Motorola | eSakal

किंमत

या फोनची किंमत तब्बल 3,995 डॉलर्स एवढी होती. म्हणजे त्या काळी हा फोन सुमारे 3.30.951 रुपयांना उपलब्ध होता.

first mobile phone call Motorola | eSakal

मोबाईल फोन

यानंतर या मोबाईल फोनमध्ये कित्येक बदल करण्यात आले. याचं आणखी स्लिम व्हर्जन हे सुमारे दहा वर्षांनी सामान्यांसाठी उपलब्ध झालं.

first mobile phone call Motorola | eSakal

रिअलमीचा स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लाँच; टॉप मॉडेलची किंमत केवळ 15 हजार

Realme 12x 5G | eSakal