Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंगने रविवारी साखरपूडा उरकला.
त्याने २६ वर्षीय खासदार प्रिया सरोजसोबत साखरपूडा केला असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचे ८ जून रोजी लखनौमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साखरपूडा झाला. या सोहळ्यासाठी क्रिकेटपटूंसह राजकारणी नेत्यांनी हजेरी लावली होती.
प्रिया सरोज ही समाजवादी पार्टीची सदस्य असून देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदार आहे. तिने २०२४ लोकसभा निवडणून मछली शहरातून जिंकली.
पेशाने वकिल असलेल्या प्रियाचे वडील तुफानी सरोज हे देखील उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते आहे.
दरम्यान, सारखपूड्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की दोघांनी अंगठ्या एकमेकांना घातल्यानंतर प्रियाला तिचे अश्रु अनावर झाले होते.
प्रिया आणि रिंकू यांची ओळख काही वर्षांपूर्वी कॉमन फ्रेंडमुळे झाली. त्यानंतर दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.