Pranali Kodre
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकून इतिहास रचला.
बंगळुरू आयपीएलचे आठवे आणि नवे विजेते ठरले.
तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बंगळुरूने आयपीएल ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले. त्यामुळे विराट कोहलीसह सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला.
याचदरम्यान, 'ने सिंघम धन' हे तमिळ गाणं प्रचंड व्हायरल झालं. अनेक बंगळुरू संघाच्यासंबंधित रिल्सवरही ते गाणं वाजलं.
हे गाणं तमिळ चित्रपट पथू थाला या चित्रपटातील असून सिद श्रीरामने गायलं आहे आणि एआर रेहमानने संगीतबद्ध केलेलं आहे.
हेच गाणं व्हायरल होण्यामागेही एक खास कारण आहे आणि त्याचा संबंध विराट कोहलीशी आहे.
झाले असं की विराट कोहलीने आयपीएल २०२५ दरम्यान 'ने सिंघम धन' हे गाणं तो लूपवर ऐकत असून ते त्याला सध्या आवडतंय असं सांगितलं होतं.
त्यानंतर हे गाणं बंगळुरू संघाशी संबंधित बऱ्याच व्हिडिओ आणि रिल्ससाठी चाहत्यांकडून वापरण्यात आलं आणि त्यामुळे व्हायरलही झालं.