मृण्मयीने सांगितला सुनील बर्वेंबरोबर काम केल्याचा अनुभव

Anuradha Vipat

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. 

mrunmayi deshpande

चित्रपट प्रदर्शित

नुकताच मृण्मयीचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित झाला.

mrunmayi deshpande

अनुभवाबद्दल

या चित्रपटानिमित्ता एका दिलेल्या मुलाखतीत मृण्मयीला तिच्या अशा एका अनुभवाबद्दल विचारण्यात आलं की जो ती कायमचा जपून ठेवेल किंवा तो तिच्या कायम लक्षात राहील

mrunmayi deshpande

दोन मिनिटांसाठी तो...

मृण्मयी म्हणाली “कुंकू मालिकेचं आमचं शूटिंग सुरू होतं तेव्हा एका सीनमध्ये काहीतरी बोलता बोलता जानकीच्या डोळ्यांत पाणी येतं आणि मी वाक्य बोलले तेव्हा सुनीलदादा त्याच्या नरसिंहच्या भूमिकेत नव्हताच जणू. दोन मिनिटांसाठी तो माझ्याकडे खूप कौतुकानं बघत होता

mrunmayi deshpande

ते सगळे त्यानं...

मृण्मयी पुढे म्हणाली, “सीन कट झाला आणि काही न बोलता तो माझा हात पकडून मला मेकअप रूममध्ये घेऊन गेला.त्यानं त्याचं पाकीट उघडलं. त्या दिवशी त्याच्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे त्यानं माझ्या हातावर ठेवले.

mrunmayi deshpande

परफॉर्मन्स

“मी भारावून गेले होते आणि खूप खूश झाले होते. तो माझ्यासाठी एक बेंचमार्क होता.“जेव्हा सुनीलदादाला परफॉर्मन्स बघून खूपच भारी वाटलं असेल तेव्हा त्यानं असं केलं असेल असं मृण्मयी पुढे म्हणाली

mrunmayi deshpande

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापवर नेटकरी पाडतायत प्रतिक्रियेंचा पाऊस