Saisimran Ghashi
७ जुलैला धोनीने ४४वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी देशभरातून चाहते, खेळाडू आणि सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
धोनीने सुरुवातीला शाळेत फुटबॉल खेळताना गोलकीपर म्हणून खेळ केला. त्याच्या जलद हालचाली पाहून प्रशिक्षकाने त्याला क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करण्यास प्रोत्साहन दिले, आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
२०११ साली धोनीला भारतीय प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल ही मानद पद देण्यात आली. २०१९ मध्ये त्याने प्रत्यक्ष काश्मीरमध्ये सैन्याबरोबर प्रशिक्षणही घेतले
धोनीच्या कर्णधारपदाखाली २००९ मध्ये भारताने प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले, जे भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण होता
धोनीला मोटारसायकलींचं प्रचंड वेड आहे. त्याच्या संग्रही अनेक विंटेज बाईक्स आहेत आणि त्याच्या रांचीतील घरात खास गॅरेज आणि मिनी-म्युझियम आहे.
दडपणाच्या परिस्थितीत शांत राहण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला "कॅप्टन कूल" हे टोपणनाव मिळाले. त्याचा संयम आणि शांत डोकं नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
सामन्याच्या शेवटी विजय मिळवून देणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनीचे नाव अग्रक्रमावर घेतले जाते. त्याची निर्णयक्षमता आणि खेळावरील पकड अफाट होती.
धोनी क्रिकेटबरोबरच लष्कर, बाईक्स, व्यवसाय आणि विविध खेळांतही सक्रीय आहे. तो एक सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आहे.