Pranali Kodre
दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो.
भारतातही हा सण जल्लोषात साजरा केला जातो.
भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनीही ख्रिसमसचे सेलीब्रेशन केले आहे.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह ख्रिसमस सेलीब्रेशन केले.
ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो धोनीची पत्नी साक्षीने शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिसते की धोनी सांताक्लॉज झाला आहे. त्याने सांताक्लॉजसारखे कपडे आणि दाढी-मिशी लावली आहे.
या फोटोंना लाखो लाईक्स आल्या असून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.