Pranali Kodre
एमएस धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांनी नुकतीच हरिद्वारला भेट दिली होती. या दोघींनी प्रसिद्ध हर की पुजा घाट येथेही जाऊन गंगेचं दर्शन घेतले.
Ziva Dhoni dream profession
साक्षी आणि झिवा यांनी तिथे भक्तांना प्रसादही वाटला, याचे काही फोटोही समोर आले होते.
Ziva Dhoni dream profession
यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यात झिवा तिला मोठेपणे कोण व्हायचे आहे हे सांगत आहे.
Ziva Dhoni dream profession
प्रत्येक लहान मुलाचं मोठं होऊन काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न असतं, तसंच स्वप्न १० वर्षांच्या झिवाचेही आहे.
Ziva Dhoni dream profession
व्हिडिओमध्ये तिला एका व्यक्तीने तिचं मोठेपण काय होण्याचं स्वप्न आहे, असं विचारल्यानंतर झिवाने पटकन उत्तर दिले की निसर्ग अभ्यासक (naturalist).
Ziva Dhoni dream profession
तिचे निसर्गासाठी काम करण्याचं स्वप्न असल्याचे उत्तर ऐकून त्या व्यक्तीनेही तिचे कौतुक केले, तसेच तिथे असलेल्या साक्षीने म्हटले की आशा आहे ती naturalist बनेल.
Ziva Dhoni dream profession
दरम्यान, झिवाला निसर्गाची आवड असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे, तिचे असे फोटोही अनेकदा पोस्ट करण्यात आले आहेत.
Ziva Dhoni dream profession
तसेच साक्षीनेही यापूर्वीही सांगितले आहे की झिवाला निर्सर्गाबद्दल प्रचंड प्रेम असून ती निसर्ग आणि प्राण्यांबद्दल नेहमीच उत्सुकतेने प्रश्न विचारत असते.
Ziva Dhoni dream profession
Rohit Sharma and Virat Kohli
Sakal