Pranali Kodre
साल २०११ वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना जिंकून देण्यात ज्या दोन खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला तो म्हणजे गौतम गंभीर आणि तत्कालिन कर्णधार एमएस धोनी.
त्याला सामन्यात दोघांमध्ये १०९ धावांची भागीदारी झाली होती. गंभीरने ९७ धावा केल्या होत्या, तर धोनीने नाबाद ९१ धावा.
धोनीने विजयी षटकारही मारला, तो आजही चाहत्यांच्या मनात ताजा असून त्यावर अनेकदा चर्चाही होते.
मात्र त्या वर्ल्ड कप विजयाचे श्रेय केवळ धोनीला मिळते, यावरून अनेकदा गंभीरने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे त्यांच्यातील नातं हा नेहमीच क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. मात्र आता हे दोघेही एकत्र एकाच फोटोमध्ये दिसल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
नुकतेच धोनी आणि गंभीर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नासाठी मसुरीला आले आहेत.
त्यामुळे यादरम्यान पत्रकर पल्लव पालिवाल यांनी या दोघांसोबत एकत्र फोटो शेअर केला आहे.