Shubham Banubakode
महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेटशीच नव्हे तर भारतीय सैन्याशीही खास संबंध आहे.
२०११ मध्ये भारतीय सैन्याने महेंद्रसिंग धोनीला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे.
धोनी हा भारतीय सैन्याच्या १०६व्या इन्फंट्री बटालियन पॅरा रेजिमेंटचा भाग आहे. ही रेजिमेंट आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते.
२०१५ मध्ये सैन्य प्रशिक्षणादरम्यान धोनीने पाच पॅराशूट जंप्स पूर्ण केल्या असून त्याने पॅराट्रूपर म्हणून स्वत:ची क्षमताही सिद्ध केली आहे.
धोनीने सैन्य प्रशिक्षणादरम्यान इतर सैनिकांप्रमाणेच कठोर प्रशिक्षण घेतले आहे. तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे.
२०१९ मध्ये धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेत काश्मीरमध्ये सेवा दिली होती. यामुळे त्याचा देशाप्रती असलेला समर्पणभाव दिसून आला.
एमएस धोनीला मानद पदवी देण्यात आली आहे. त्यामुळे युद्धाच्या वेळी त्याला सीमेवर जाण्याची गरज नाही.
धोनी नेहमीच सैन्याप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त करतो. त्यांचे सैन्याशी असलेले नाते केवळ औपचारिक नसून भावनिक आहे.
सैन्यातील धोनीच्या योगदानामुळे तो तरुणांसाठी एक आदर्श खेळाडू ठरला आहे.