Pranali Kodre
एमएस धोनी स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक षटकार मारले असून अनेक दिग्गज गोलंदाजांविरुद्ध षटकार मारले आहेत.
धोनीने आयपीएलमध्ये २६४ सामने खेळले असून ५००० हून अधिक धावा केल्या आहेत.
धोनीने आयपीएलमध्ये २५२ षटकार मारले आहेत.दरम्यान, असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्याविरुद्ध धोनीला षटकार मारता आलेला नाही.
आयपीएलमध्ये धोनीने ३० हून अधिक चेंडूंचा सामना केलेल्या गोलंदाजांपैकी कोणत्या गोलंदाजांविरुद्ध षटकार मारला नाही, अशा काही गोलंदाजांवर एक नजर टाकू.
धोनीने हर्षल पटेलविरुद्ध ३३ चेंडू खेळला असून तीनदा बाद झाला आहे. त्याच्याविरुद्ध धोनीला एकही षटकार मारता आलेला नाही.
धोनीने जोफ्रा आर्चरविरुद्ध ३७ चेंडू खेळले असून एकदाही त्याला षटकार मारलेला नाही.
रोएलॉफ वॅन देर मेरवे असा गोलंदाज आहे, ज्याच्याविरुद्ध धोनीने एकही षटकार किंवा चौकार मारलेला नाही. त्याच्याविरुद्ध धोनी ३८ चेंडू खेळला असून ३२ धावा केल्या आहेत.
धोनी सुनील नारायणविरुद्ध ७४ चेंडू खेळला आहे. पण त्याला एकदाही षटकार मारता आला नाही. तसेच केवळ एकच चौकार धोनीने त्याच्याविरुद्ध मारला आहे.