Pranali Kodre
एमएस धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो सर्वांना केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.
मात्र असे असले तरी धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही तो बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. त्यातही त्याच्या लूकची चर्चा नेहमीच होते.
सध्या त्याचा नवा लूक सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसला होता, त्यानंतर तो आता नव्या लूकमध्ये दिसला आहे.
धोनीच्या नव्या लूकमधील फोटो सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये धोनीची नवी हेअरस्टाईल दिसत असून त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे आणि डोळ्यावर गॉगलही आहे.
धोनीचा हा नवा लूक कोट्यवधी चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून लाईक्सही भरभरून येत आहेत.