Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५ विकेट्स विजय मिळवला.चेन्नईच्या या विजयात ४३ वर्षीय धोनीने मोलाचा वाटा उचलला.
धोनीने ११ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २६ धावांची नाबाद खेळी केली, तसेच यष्टीरक्षण करताना आयुष बडोनीला यष्टीचीत केले होते, तर रिषभ पंतचा झेल घेतला होता. अब्दुल सामदला धावबाद केले होते.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्याने हा सामनावीर पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याचे वय ४३ वर्षे २८१ दिवस वय होते.
त्यामुळे धोनी आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
याआधी हा विक्रम प्रवीण तांबेच्या नावावर होता. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २०१४ मध्ये ४२ वर्षे २०८ दिवस वय असताना सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
त्याखाली शेन वॉर्न असून त्याने ४१ वर्षे २२३ दिवस दिवस वय असताना सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
चौथ्या क्रमांकावर ऍडम गिलख्रिस्ट असून त्याने ४१ वर्षे १८१ दिवस वय असताना सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
ख्रिस गेलने ४१ वर्षे ३५ दिवस वय असताना सामनावीर पुरस्कार जिंकला होता.