Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व सोडत ही जबाबदारी त्याने युवा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली.
त्यामुळे धोनी आयपीएल 2024 मध्ये ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसत आहे.
धोनीचे आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा ऋतुराज चौथा कर्णधार आहे.
धोनी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात 2017 आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला होता.
धोनी 2017 साली रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडूनच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आयपीएलचा सामना खेळला होता. त्यावेळी रहाणेने स्मिथच्या अनुपस्थितीत एका सामन्यात नेतृत्व केले होते.
आयपीएल 2022 मध्ये धोनीने रविंद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे जडेजाच्या नेतृत्वातही धोनी खेळला. पण जडेजाने 8 सामन्यांनतर ही जबाबदारी सोडल्याने धोनी पुन्हा कर्णधार झाला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनी एक सामना सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालीही खेळला आहे.