MS Dhoni ने आयपीएलमध्ये केलेत 'हे' मोठे विक्रम

Pranali Kodre

एमएस धोनी

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्स संघाने ४३ वर्षीय एमएस धोनी यालाही रिटेन केलं होतं, त्यामुळे तो या स्पर्धेत खेळताना दिसत आहे.

MS Dhoni | Sakal

वयस्कर खेळाडू

आयपीएल इतिहासातील तो तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तर आयपीएल २०२५ मध्ये खेळणारा तो सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे.

MS Dhoni | Sakal

विक्रम

धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याने गेल्या १८ वर्षात अनेक विक्रम केले आहेत.

MS Dhoni | Sakal

सर्वाधिक विजेतेपद

धोनीने कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्ससाठी २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ या पाचवर्षी आयपीएल विजेतेपद आणि २०१० व २०११ साली चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे.

MS Dhoni | Sakal

कर्णधार

धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये २२६ सामने खेळले आहेत.

MS Dhoni | Sakal

एकमेव कर्णधार

धोनी आयपीएलमध्ये २०० हून अधिक सामने कर्णधार म्हणून खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

MS Dhoni | Sakal

CSK साठी सर्वाधिक धावा

धोनीने आयपीएलमध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावाही केल्या आहेत. त्याने ५ एप्रिल २०२५ पर्यंत ४७१५ धावा केल्या आहेत

MS Dhoni | Sakal

फिनिशर

धोनी सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये डावाच्या २० व्या षटकात सर्वाधिक धावा केल्या आहेत. ५ एप्रिलपर्यंत त्याने २० व्या षटकात ८३० धावा केल्या आहेत.

MS Dhoni | Sakal

सर्वोत्तम यष्टीरक्षक

धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. त्याने ५ एप्रिलपर्यंत १९४ विकेट्स यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत. यामध्ये १४९ झेल आणि ४५ यष्टीचीतचा समावेश आहे.

MS Dhoni | Sakal

स्ट्राईक रेट

धोनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सातत्याने जवळपास १३७ चा स्ट्राईक रेट राखला आहे.

MS Dhoni | Sakal

IPL मध्ये खेळलेले सर्वात वयस्कर ५ खेळाडू

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा