...अन् धोनी घराघरात पोहोचला

प्रणाली कोद्रे

5 एप्रिल

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी 5 एप्रिल ही तारीख खूप खास आहे.

MS Dhoni | X/BCCI

पहिलं शतक

धोनीने 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 5 एप्रिल 2005 रोजी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते.

MS Dhoni | X/ICC

भारत विरुद्ध पाकिस्तान

त्याने 5 एप्रिल 2005 रोजी विशाखापट्टणमला सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध खेळताना हे शतक ठोकले होते.

MS Dhoni | X/BCCI

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी

धोनीचा हा त्याच्या कारकिर्दीतील पाचवा वनडे सामना होता. या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

MS Dhoni | X/BCCI

तुफानी खेळी

धोनीने फलंदाजीला आल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत तुफानी फटकेबाजी केली. त्याने 123 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत 148 धावा ठोकल्या होत्या.

MS Dhoni | X/ICC

घराघरात पोहचलं नाव

त्याच्या या खेळीनंतर तो प्रकाशझोतात तर आलाच, पण त्याचे नाव घराघरात पोहचले.

MS Dhoni | X/ICC

भारताचा विजय

धोनीने केलेल्या त्या खेळीमुळे त्या सामन्यात भारताने 50 षटकात 9 बाद 356 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने 357 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 44.1 षटकात सर्वबाद 298 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला होता.

MS Dhoni | X/ICC

IPL: 'तुला भेटून नेहमीच...' पराभवानंतरही पंतची शाहरुख खानसाठी खास पोस्ट

Rishabh Pant | Shah Rukh Khan | IPL 2024 | X/KKRiders