IPL: 'तुला भेटून नेहमीच...' पराभवानंतरही पंतची शाहरुख खानसाठी खास पोस्ट

प्रणाली कोद्रे

कोलकाताचा विजय

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला तब्बल १०६ धावांनी पराभूत केले.

KKR | Sakal

शाहरुख खान

दरम्यान, कोलकाताच्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक आणि अभिनेता शाहरुख खान दोन्ही संघातील खेळाडूंना भेटला.

KKR | Shah Rukh Khan | IPL 2024 | Sakal

शाहरुखने घेतली पंतची भेट

यावेळी शाहरुखने दिल्लीचा कर्णधार पंतलाही भेटून कडकडून मिठी मारत त्याचे कौतुक केले.

Rishabh Pant | Shah Rukh Khan | IPL 2024 | Sakal

दिल्लीचा पराभव

१४ महिन्यांनंतर आयपीएल २०२४ स्पर्धेतून पुनरागमन करणाऱ्या पंतने या सामन्यात २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली होती. पण दिल्लीचा संघ १८ व्या षटकात १६६ धावांवर सर्वबाद झाला.

Rishabh Pant | Shah Rukh Khan | IPL 2024 | X/KKRiders

पंतची पोस्ट

शाहरुखच्या भेटीबद्दल पंतने इंस्टाग्राम स्टोरीवरही खास पोस्ट करत कॅप्शन दिले आहे की 'भैय्या तुम्हाला भेटून नेहमीच आनंद मिळतो, नेहमीच उर्जा मिळते.'

Rishabh Pant Post | Instagram

दिल्लीच्या खेळाडूंचीही भेट

दरम्यान, शाहरुखने केवळ पंतचीच नाही, तर दिल्ली संघातील इशांत शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार अशा अनेक खेळाडूंचीही भेट घेतली.

Ishant Sharma | Shah Rukh Khan | IPL 2024 | Sakal

कोलकाता संघातील खेळाडूंचे कौतुक

याशिवाय शाहरुख कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरसह अन्य खेळाडूंनाही भेटला आणि त्यांचे अभिनंदन केले.

KKR | Shah Rukh Khan | IPL 2024 | Sakal

IPL: सर्वात जलद 3000 धावा करणारे फलंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Quinton de Kock | Sakal