Shubham Banubakode
महेंद्रसिंग धोनीला 'कॅप्टन कुल' म्हणून ओळखले जाते, त्याने आपल्या शांत आणि धोरणात्मक नेतृत्वाने क्रिकेट जगतात स्वतःचा ठसा उमटवला.
धोनीच्या नेतृत्वातील पाच महत्त्वाचे निर्णय, ज्याने त्याला कॅप्टन कुल अशी ओळख दिली.
2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना धोनीने शांत राहत जोगिंदर शर्माला संधी दिली.
2011 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारत अडचणीत असताना फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगऐवजी धोनीने स्वतः पुढे येत फलंदाजीचा निर्णय घेतला.
2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताला 4-0 अशा पराभव सहन करावा लागला. तरीही धोनीने शांत राहून पत्रकारांना उत्तरं दिली.
2016 च्या टी-20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना धोनीने ग्लोव्हज काढून रनआउटसाठी धाव घेतली.
2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला अनेकांनी ‘डॅड्स आर्मी’ म्हणून हिणवले. पण धोनीच्या शांत आणि अनुभवी नेतृत्वाने CSK ला आयपीएल चॅम्पियन बनवले.