Crab Health Benefits : पावसाळ्यात खेकड्याचा रस्सा किंवा सूप पिण्याने खरोखरच सर्दी-खोकला बरा होतो का? जाणून घ्या वैज्ञानिक बाजू!

बाळकृष्ण मधाळे

खेकड्यांच्या चविष्ट मेजवानीची पर्वणी

पावसाळा सुरू होताच नद्या, ओढे, खाड्या आणि भातशेती परिसरात खेकड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो. या काळात खेकडे सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांसाठी हा हंगाम म्हणजे खेकड्यांच्या चविष्ट मेजवानीची पर्वणीच असते.

Mud Crab Benefits

|

esakal

खेकड्याचे सूप पिण्याची परंपरा

ग्रामीण भागात विशेषतः खेकड्याचे सूप किंवा रस्सा पिण्याची परंपरा आहे. पावसाळ्यात खेकडा खाल्ल्याने सर्दी-खोकला कमी होतो, असा समज अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मात्र, यामागील वैज्ञानिक बाजू काय आहे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Mud Crab Benefits

|

esakal

आयुर्वेद काय सांगत?

खेकड्याचा गुणधर्म आयुर्वेदानुसार, उष्ण मानला जातो. पावसाळ्यात वातावरणात गारवा असल्याने खेकड्याचे गरम सूप किंवा रस्सा शरीराला उब देण्यास मदत करतो.

Mud Crab Benefits

|

esakal

खेकडा खाल्ल्याने सर्दी-खोकला बरा होतो

गरम द्रवपदार्थ घेतल्यामुळे घशातील त्रास आणि छातीत साचलेला कफ कमी होण्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मात्र, खेकडा खाल्ल्याने सर्दी किंवा खोकला थेट बरा होतो, असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

Mud Crab Benefits

|

esakal

खेकड्यात कोणते घटक आढळतात?

खेकड्यामध्ये झिंक (Zinc) आणि व्हिटॅमिन सीसारखे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करणारे पोषक घटक आढळतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होऊ शकते आणि हंगामी संसर्गांपासून संरक्षण मिळण्यास हातभार लागू शकतो.

Mud Crab Benefits

|

esakal

प्रोटीनचा उत्तम स्रोत

खेकड्याचे मांस उच्च दर्जाच्या प्रोटीनचा उत्तम स्रोत मानले जाते. त्यामध्ये चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने स्नायूंची वाढ आणि शरीराच्या ऊतींची दुरुस्ती यासाठी ते उपयुक्त ठरते.

Mud Crab Benefits

|

esakal

खेकड्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाण

याशिवाय, खेकड्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास, रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास आणि मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देण्यास मदत करतात.

Mud Crab Benefits

|

esakal

हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त

खेकड्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसही भरपूर प्रमाणात आढळतात. हे दोन्ही खनिज हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असून शरीराच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Mud Crab Benefits

|

esakal

पावसाळ्यातच खेकडे जास्त का दिसतात?

पावसाळा हा खेकड्यांचा नैसर्गिक प्रजननाचा हंगाम असतो. या काळात मादी खेकडे अंडी घालण्यासाठी, तर नर खेकडे जोडीदाराच्या शोधात बिळांमधून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांची संख्या अधिक दिसून येते.

Mud Crab Benefits

|

esakal

खेकडे कुठे राहतात?

उन्हाळ्यात खेकडे जमिनीखाली खोल बिळांमध्ये राहतात. मात्र, पावसाळ्यात या बिळांमध्ये पाणी भरल्याने श्वास घेण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना बाहेर पडावे लागते.

Mud Crab Benefits

|

esakal

पावसाळ्यात खेकडे सहज पकडता येतात

याचबरोबर पावसाळ्यात नद्या, ओढे आणि खाड्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे अनेक खेकडे पाण्याबरोबर वाहत शेतांमध्ये किंवा नदीकाठच्या भागात येतात. त्यामुळे या काळात ते सहज पकडता येतात आणि बाजारातही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.

Mud Crab Benefits

|

esakal

महत्त्वाची सूचना

खेकडा हा पौष्टिक अन्नपदार्थ असला तरी ज्यांना समुद्री अन्नाची अॅलर्जी, किडनीचे आजार किंवा विशिष्ट वैद्यकीय समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे सेवन करावे. तसेच खेकडे नेहमी पूर्णपणे शिजवूनच खावेत.

Mud Crab Benefits

|

esakal

Albino Alligator Gar : निसर्गाचा अद्भूत चमत्कार! रायगडमध्ये आढळला पिवळ्या-नारंगी रंगाचा 'अल्बिनो गार'; तोंड पाहून बसेल धक्का

What Is an Albino Alligator Gar?

|

esakal

येथे क्लिक करा...