Shubham Banubakode
इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम याने विल्यम नॉरिसला नवीन ईस्ट इंडिया कंपनीच्या सवलतींसाठी औरंगाबादेला पाठवले. नॉरिसने सुरत ते औरंगाबाद प्रवासात मुघल सैन्याची दयनीय अवस्था टिपली.
नॉरिसने लिहिले की, मुघलांचे मोठमोठे अधिकारी मराठ्यांच्या भीतीने प्रवास करायला कचरत. मराठ्यांचा दबदबा मुघल सैन्यावर स्पष्ट दिसत होता.
६ मार्च १७०१ रोजी नॉरिस ब्रह्मपुरी येथील मुघल छावणीत पोहोचला. त्याला छावणीचा अव्यवस्थितपणा आणि गलथान कारभार दिसला.
नॉरिसच्या मते, छावणीत सुमारे एक लाख लोक होते, पण यात जनानखाने, नोकर-चाकर, व्यापारी, सराफ, दलाल, आणि अगदी वेश्या यांचाही समावेश होता.
लाख माणसांपैकी फक्त चार हजारच लढण्यायोग्य होते, आणि त्यातही निधड्या छातीचे केवळ पाचशे सैनिक असावेत, असे नॉरिसने नोंदवले.
मुघल वजीर असदखान ३० बायका आणि अनेक उपस्त्रियांमध्ये रममाण होता. तो आणि इतर अधिकारी दारूच्या आहारी गेले होते.
मिरजेजवळ मेलेली हत्ती, उंट यांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती, ज्यामुळे मुघल छावणीची दुरवस्था स्पष्ट होत होती.
मनसबदार आठ हजार स्वारांचा हिशोब दाखवत, पण प्रत्यक्षात दीड हजारच ठेवत. उरलेला पगार त्यांच्या खिशात जाई, असा सर्रास भ्रष्टाचार चालत असे.
पगार वेळेवर न मिळाल्याने मुघल सैनिकांमध्ये असंतोष वाढत होता. सैनिक आणि लोक बादशहा व अधिकाऱ्यांविरुद्ध कडू शब्द बोलू लागले.
लष्कराचा पगार चुकता करण्यात औरंगजेबाची तारांबळ उडत असे. मनसबदारांच्या लबाड्यांमुळे आणि अव्यवस्थेमुळे मुघल सैन्य कमकुवत होत गेले.