संतोष कानडे
औरंगजेबाला दरबारातील संगीताची आवड नव्हती, त्यामुळे त्याने शाही दरबारातील संगीतकार आणि गायकांवर बंदी घालून त्यांचे पेन्शन बंद केले होते.
विलासी जीवनशैलीला विरोध म्हणून त्याने दरबारातील आणि सार्वजनिक ठिकाणच्या नृत्यांवर कडक निर्बंध लादले होते.
इस्लामिक आचारसंहितेचे पालन करत त्याने संपूर्ण साम्राज्यात मद्यपान, जुगार आणि गांजासारख्या अमली पदार्थांच्या वापरावर व विक्रीवर पूर्ण बंदी घातली होती.
औरंगजेब स्वतः साधे कपडे घालत असे आणि त्याला दरबारी लोकांचा किंवा स्त्रियांचा अतिविलासी, उधळपट्टीचा आणि भडक पेहराव अजिबात पसंत नव्हता.
पूर्वजांप्रमाणे दरबारात चालणारा ऐषआराम, भव्य मेजवान्या आणि सरकारी खजिन्यातून होणारी पैशांची उधळपट्टी तो नापसंत करत असे.
मुघल सम्राटांनी जनतेला दर्शन देण्याची सुरू केलेली 'झरुखा दर्शन' ही प्रथा इस्लामविरोधी आणि व्यक्तीपूजेला प्रोत्साहन देणारी मानून त्याने ती बंद केली.
राजाला सोन्या-चांदीत तोलण्याची (तुलादान) जुनी दरबारी प्रथा औरंगजेबाने अनावश्यक खर्च आणि हिंदू रीतीरिवाज मानून थांबवली होती.
दरबारी आदरातिथ्य किंवा स्वागताच्या वेळी कपाळावर टिळा लावण्याच्या प्रथेला त्याने दरबारातून हद्दपार केले होते.
विटाळ किंवा अपवित्रता टाळण्यासाठी, नाण्यांवर कलमा लिहिण्यास त्याने स्पष्ट विरोध केला आणि ही प्रथा बंद पाडली.
नशिबावर विसंबून राहणे किंवा ज्योतिषांच्या सल्ल्याने दरबारी निर्णय घेणे त्याला अमान्य होते, त्यामुळे त्याने शाही ज्योतिषांची पदे रद्द केली होती.