Shubham Banubakode
जहांगीरने त्याचे वडील अकबरच्या स्मृतीपित्यर्थ गुरुवार आणि रविवारी प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घातली होती. तुजुक-ए-जहांगीरीमध्ये याचा उल्लेख आहे.
जहांगीरने जैन धर्माच्या महत्त्वाच्या सणांदरम्यान प्राण्यांची कत्तल थांबवली होती. जैन समाजाच्या भावनांचा आदर करत त्याने हे पाऊल उचललं होतं.
जहांगीरने एक अनोखा नियम बनवला होता. जसं त्याचं वय वाढेल, वर्षातले तेवढे दिवस प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी असेल, असं त्याने जाहीर केलं होतं.
जहांगीरला फक्त पाळीव प्राण्याची आवड नव्हती, तो पक्षी आणि प्राण्यांचे बारकाईने निरीक्षण करायचे. त्याने तुजुक-ए-जहांगीरीमध्ये हे निरीक्षण लिहून ठेवलंय.
जहांगीरने हत्तींसाठी 'हाथी महाल' नावाने विश्रामगृह बांधलं होतं. यातून त्याचा प्राण्यांप्रती असलेला आदर दिसून येतो.
जहांगीरने त्याच्या राज्यात 'न्यायाची साखळी' लावली होती. कोणावरही अन्याय झाल्यास साखळी खेचून सम्राटाकडे तक्रार करता येत असे.
जहांगीरने रुग्णालये बांधली, प्रवासाच्या मार्गांना सुरक्षित केले आणि नाक-कान कापणे यासारख्या क्रूर शिक्षांना बंदी घातली.