Yashwant Kshirsagar
मुघल बादशहा जहांगीरने १६११ साली घेतलेल्या एका निर्णयामुळे मुघलकाळात घटस्फोट घेणाऱ्या महिलांचे अधिकार वाढले.
या ऐतिहासिक दस्तऐवजात घटस्फोट आणि महिलांच्या हक्कांसंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय नोंदवले आहेत.
२० जून १६११ या दिवशी जहांगीरने जाहीर केले की, कुठलेही ठोस कारण नसताना दिलेला घटस्फोट 'अवैध' ठरेल.
या निर्णयानंतर महिलांनी आपला आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाऊ लागल्या.
घटस्फोटासाठी महिलांना स्वतःहून काझीकडे जाण्याचा अधिकार मिळाला, हा एक मोठा सामाजिक बदल होता!
एका प्रकरणात पतीने ६० महमूदी नाणी मागून घटस्फोट दिला, पण काझीने यावर लक्ष ठेवले.
फत बानूने पतीच्या दारूच्या व्यसनामुळे काझीकडे तक्रार दाखल केली, आणि त्याला पतीपदाचे हक्क गमवावे लागले.
पतीने पाच वर्षे दिलेले वचन न पाळल्यामुळे काझीने १६१२ मध्ये पत्नीच्या बाजूने निकाल दिला.
जहांगीरच्या निर्णयानंतर महिलांचे म्हणणे गंभीरतेने ऐकले जाऊ लागले – हे एक ऐतिहासिक वळण होते.