महिलांची वस्त्रं परिधान करुन फिरणारा मुघल बादशाहा

संतोष कानडे

‘रंगीला’ मुगल बादशहा कोण होता?

मुहम्मद शाह रंगीला! १७१९ ते १७४८ या काळात दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेला हा बादशाह युद्धापेक्षा आपल्या आगळ्यावेगळ्या आणि मनोरंजक आवडीनिवडींसाठी ओळखला जातो.

रंगील्याचं बालपण

२७ सप्टेंबर १७१९ रोजी रोशन अख्तर दिल्लीचा बादशाह बनला, तेव्हा त्याचे वय केवळ १६ वर्ष होते! पुढे हाच तरुण ‘मुहम्मद शाह रंगीला’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला.

कलेचा भोक्ता राजा

रंगीला राजाला शायरी, संगीत आणि नृत्याची विशेष आवड होती. त्याच्या काळात कलाकारांना पुन्हा एकदा समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले.

महिला वेशभूषेची अनोखी आवड

इतिहासाच्या पानांवर नोंद आहे की रंगीला बादशहाला स्त्रियांचे कपडे परिधान करण्याचा विलक्षण शौक होता. तो अनेकदा दरबारातही घागरा-चोली, पेटीकोट घालून येत असे!

युद्धापासून कोसो दूर...

जेव्हा मराठा सैन्याने दिल्लीवर चढाई केली, तेव्हा रंगीला स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो महालात बसून कोंबड्यांच्या झुंजीचा आनंद घेत होता!

कलांना पुन्हा मिळाली प्रतिष्ठा

औरंगजेबाच्या कठोर इस्लामी कायद्यांनंतर, रंगीलाने संगीत, नाट्य आणि शायरी यांसारख्या कलांना पुन्हा एकदा राजदरबारात आणि समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.

केवळ नाममात्र बादशाह

राज्याचा कारभार आणि युद्धनीती यांकडे रंगीलाचे पूर्णपणे दुर्लक्ष होते. याच कारणामुळे मुघल सल्तनत हळूहळू कमजोर होत गेली.

‘रंगीला’ हे नाव कसे पडले?

त्याचं विचित्र आणि रंगीबेरंगी व्यक्तिमत्व, वेगळ्या सवयी आणि वागण्याच्या पद्धतीमुळे त्याला ‘रंगीला’ हे टोपणनाव मिळाले, जे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी तंतोतंत जुळते.

दिल्लीचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन

तरीही, त्याच्या काळात संगीत आणि भारतीय पारंपरिक वेशभूषेत जे बदल झाले, त्यासाठी त्याचे शासन महत्त्वपूर्ण मानले जाते.

राजा म्हणून अपयशी, पण...

मुहम्मद शाह रंगीला एक यशस्वी शासक ठरला नाही, परंतु त्याने दिल्लीमध्ये कला आणि संस्कृतीला नवसंजीवनी दिली, हे निश्चित!

औरंगजेबाने महिलांच्या अंतर्वस्त्रावरुन काढला होता नियम

<strong>येथे क्लिक करा</strong>