'या' मुघल बादशहाची दाढी एका रात्रीतून का झाली पांढरी?

सकाळ वृत्तसेवा

केस

माणसाचे केस हळूहळू पांढरे होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु एका मुघल बादशहाची दाढी रात्रीतून पांढरी झाली होती

इतिहास

इतिहासामध्ये असे उल्लेख आहेत. मुघल बादशहा शाहजहांची दाढी रातोरात पांढरी झाली होती. त्यामुळे दरबारात सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं

फ्रेंच प्रवासी

फ्रेंच प्रवासी बर्नियरने लिहिले की, शाहजहां बादशहा हा आपली पत्नी मुमताजच्या हयातीत आणि तिच्या मृत्यूनंतरही तिच्यावर मोहित होता

मृत्यू

मुमताजच्या मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपर्यंत शाहजहां पत्नीशी लैंगिकदृष्ट्या एकनिष्ठ राहिला, अशी नोंद आहे.

शाहजहां

हा कालावधी सुमारे ३५ वर्षांचा होता. शाहजहांचा मृत्यू १६६६ साली झाला, तर मुमताजचे निधन १६३१ साली झाले.

तणाव

मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहांने एवढ्या तणावात होता की, रातोरात त्याची दाढी पांढरी झाली होती.

कालावधी

प्रत्यक्षात हे घडण्यासाठी काही कालावधी गेला असेल, परंतु इतिहासकारांनी बोलीभाषेप्रमाणे अशी नोंद केलेली आहे

वचन

महत्त्वाचं म्हणजे शाहजहांने मृत्यूवेळी मुमताजला दिलेल्या वचनांचं आयुष्यभर पालन केलं होतं.

या ठिकाणच्या सिताफळांची निझामाला पडली होती भूरळ

<strong>येथे क्लिक करा</strong>