सकाळ वृत्तसेवा
मुघल बादशहा शाहजहांचा मृत्यू एका दुर्मिळ आजारामुळे झाल्याची इतिहासामध्ये नोंद आहे.
इटालियन प्रवासी मनूची याने लिहिल्यानुसार, शाहजहां आपल्या लैंगिक समाधानासाठी आपल्याच अधिकाऱ्यांच्या पत्नींचा वापर करत असे.
शाहजहां आपली लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी कामोत्तेजक औषधे घ्यायचा, असंही मनुचीने लिहून ठेवलं आहे.
याच औषधांमुळे शाहजहांला 'युरिनरी डिसऑर्डर' झाला होता. या समस्येला 'स्ट्रँगरी' असेही म्हणतात.
या आजारामुळे रुग्णाला सातत्याने लघुशंकेला जावं लागतं. लघवीतून तीव्र दुर्गंधी येते.
मनूचीशिवाय युरोपियन प्रवासी बर्नियर यानेही शाहजहांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
मृत्यूच्या शेवटच्या क्षणी मुलगा औरंगजेबने शाहजहांचे हाल केल्याचं नमूद आहे
शेवटी-शेवटी त्याच्या खाण्यावरही औरंगजेबने बंधनं लादलेले होते.