संतोष कानडे
मुघल बादशहा शाहजहां हे १६२८ मध्ये गादीवर बसला. गीत, संगीत, शेरोशायरी.. नाचगाणं यामध्ये त्याला रस होता.
शाहजहां जिथे जिथे जाई तिथे त्याच्यासोबत महिलांचा पूर्ण गट जात असे. त्याला कंचन म्हटलं जात होतं.
शाहजहां हा खाण्यापिण्याचा शौकिन होता. त्याच्या खाण्याचा मेन्यू हकीम ठरवायचे. एका-एका गोष्टीकडे बारकाईने बघितलं जाई.
सलमा हुसैन यांच्या 'द मुघल फीस्टः रेसिपीज फ्रॉम द किचन ऑफ एंपरर शाहजहां' यात खाणंपाणाविषयी माहिती दिली आहे.
सलमा हुसैन लिहितात, शाहजांसाठी पुलाव बनवला जात असे. त्यातील भातावर चांदीच्या वर्कने लेप लावला जाई.
चांदीचं वर्क अससेला राईस पचण्यासाठी उत्तम असल्याचं हकीम सांगायचे. सोबतच कामोत्तेजना वाढीस येई.
शाहजहां हा आपल्या राण्यांसोबत आणि दुसऱ्या महिलांसोबतच भोजन करायचा, असं सलमा हुसैन लिहितात.
शाहजहांला सातत्याने आपल्या मृत्यूची भीती वाटत असे. आपल्याला कुणीतीर विष देईल, असं त्याला वाटत असे.
त्यामुळे त्याने आपल्या सुरक्षेत जराही कसर सोडली नव्हती. स्वतः खाण्यापूर्वी दुसरा एक व्यक्ती चव चाखत असे.
कारागिरांनी शाहजहांसाठी एक खास चिनी माती वापरुन एक खास भांडं डिझाईन केलं होतं.
त्या भांड्यात विषयुक्त भोजन टाकल्यास त्याचा रंग बदलत असे किंवा लगेच ते भांडं फुटत असे.
शाहजहांची ही प्लेट आजही आग्र्याच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे. या प्लेटबद्दल लिहिलंय की, 'जहर परख रकाबी'