संतोष कानडे
मुघल बादशहांच्या जीवनात शिकार हा एक महत्त्वाचा राजेशाही छंद मानला जात असे.
बाबरपासून पुढील अनेक मुघल शासकांना शिकारीच्या मोहिमांमध्ये विशेष रस होता.
शिकार ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नव्हती, तर राजाच्या धैर्य आणि युद्धकौशल्याचे प्रदर्शनही मानले जात असे.
शिकारीसाठी बादशहा मोठ्या लवाजम्यासह जंगल आणि दुर्गम भागात जात असत.
वाघ, सिंह, हरीण, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार केली जात असे.
शिकारीच्या मोहिमांमध्ये घोडे, हत्ती, शिकारी कुत्रे आणि प्रशिक्षित शिकारी पक्ष्यांचाही वापर केला जात असे.
अकबराला शिकारीसोबत प्राण्यांचे निरीक्षण आणि त्यांच्या वर्तनाची नोंद करण्यातही रस होता.
जहांगीरने आपल्या आत्मचरित्रात अनेक प्राणी, पक्षी आणि शिकारीच्या घटनांचे वर्णन केले आहे.
औरंगजेबाची इतर काही बादशहांपेक्षा जीवनशैली अधिक साधी असली, तरी त्यानेही शिकार केली होती.
अनेक मुघल बादशहांमध्ये आढळणारा प्रमुख राजेशाही शौक शिकार होता होता, असे म्हणणे चूक नाही.
brown sugar
esakal