सकाळ वृत्तसेवा
मुघल बादशहांच्या हरममधली एक धक्कादायक बाब इतिहासांच्या पानांमधून पुढे आलेली आहे.
मुघल बादशहा दासींना झोपण्यासाठी खास सोय करायचे. त्यासाठी तसे आदेशदेखील दिला जात होते.
मुघल बादशहा हरममध्ये मनोरंजनासाठी जात असत. ते तिथे आपल्या राण्यांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करायचे.
हरममध्ये नाचगाणं आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. बादशहा येणार म्हटलं की, नृत्यांगणा तयारच असायच्या.
बादशहासमोर उत्तोमत्तम कला सादर करण्यासाठी नृत्यांगणा आणि दासींमध्ये चढाओढ लागलेली असायची.
विशेष म्हणजे रात्र-रात्र नाचगाणं सुरु असायचं. कधीकधी तर कित्येक दिवस ही नृत्य कसरत सुरुच असायची.
अशावेळी नृत्यांगणा आणि दासींना आराम मिळत नसे. त्या भरपूर थकत. त्यांना आराम मिळावा, असं बादशहाला वाटे.
त्यामुळे मुघल बादशहा आपल्या बेगमांना आणि किन्नरांना सांगून दासींना आरामासाठी वेळ द्यायला सांगायचे.
दासींना झोपण्यासाठी अनेक रात्री मिळायच्या. असे अनेक गट होते, ज्यामुळे बादशाहच्या मनोरंजनामध्ये खंड पडत नसे.