संतोष कानडे
मुघल बादशहा बाहेरून अत्यंत शक्तिशाली दिसत असले, तरी त्यांना अनेक गोष्टींची भीती वाटायच.
इतिहासकारांच्या नोंदीनुसार, अनेक मुघल शासकांना रात्री हत्या होण्याची भीती सतावत असे.
सत्तेसाठी राजघराण्यातच कटकारस्थानं होत असल्याने ते नेहमी सावध राहत.
औरंगजेब तर आपल्या मुलांवर आणि सरदारांवरही पूर्ण विश्वास ठेवत नव्हता.
अकबर आणि जहांगीर यांच्या काळात राजवाड्यांमध्ये गुप्तहेर व्यवस्था अत्यंत मजबूत ठेवली जात होती.
रात्रीच्या वेळी महालांच्या सुरक्षेसाठी विशेष रक्षक आणि गुप्त पहारेकरी तैनात असत.
काही मुघल बादशहांना विष देऊन मारले जाईल, अशीही भीती होती, त्यामुळे अन्न आधी चाखून पाहिले जात असे.
त्या काळात ज्योतिष, अपशकुन आणि स्वप्नांवरही मोठा विश्वास ठेवला जात होता.
काही बादशहा रात्री एकटे झोपत नसत आणि खोली वारंवार बदलत असत.
इतिहास सांगतो की, मुघल साम्राज्य जितकं वैभवशाली होतं, तितकंच ते भीती, संशय आणि सत्तासंघर्षांनी भरलेलं होतं.