संतोष कानडे
मुघल बादशहांना शिकारीची विशेष आवड होती. शिकार हा त्यांच्यासाठी केवळ विरंगुळा नव्हता, तर राजेशाही सामर्थ्य दाखवण्याचा एक मार्गही होता.
बाबरला बागांची विशेष आवड होती. त्याने भारतात अनेक बागांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.
बाबरने आपल्या आत्मचरित्रात मद्यपानाच्या सवयीचा उल्लेख केला आहे. पुढे त्याने मद्यत्याग करण्याचाही निर्णय घेतला होता.
जहांगीरला चित्रकला, निसर्ग, प्राणी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची विशेष आवड होती.
जहांगीरने आपल्या आत्मचरित्रात मद्यपान आणि अफूच्या सेवनाच्या सवयींबद्दलही स्पष्टपणे लिहिले आहे.
अकबरला संगीत, नृत्य आणि विविध कलांचे कार्यक्रम पाहण्याची आवड होती.
अकबर धार्मिक आणि तात्त्विक विषयांवर विद्वानांशी चर्चा करत असे. फतेहपूर सिक्री येथील इबादतखाना यासाठी प्रसिद्ध आहे.
शाहजहानला सुंदर इमारती, संगमरवरी वास्तू आणि भव्य बागांची विशेष आवड होती.
औरंगजेब इतर मुघल बादशहांच्या तुलनेत अधिक साधे जीवन जगत असे. तो धार्मिक आचरण आणि कुराण पठणाला महत्त्व देत होता.