संतोष कानडे
स्वित्झर्लंडमधील लाउटरब्रुनेन हे जगातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक मानले जाते.
स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले लाउटरब्रुनेन पर्यटकांचे आकर्षण आहे.
या ठिकाणाला उंच पर्वत, हिरव्यागार दऱ्या आणि सुंदर धबधब्यांचे अप्रतिम वरदान लाभले आहे.
येथील दरीच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच डोंगर आणि मध्ये हिरवीगार कुरणे पाहायला मिळतात.
लाउटरब्रुनेन परिसरात तब्बल ७२ धबधबे असल्याचे सांगितले जाते.
यातील स्टॉबबाख धबधबा हा येथील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे.
उंच कड्यावरून कोसळणारे पाणी आणि त्यातून तयार होणारे धुक्याचे लोट पर्यटकांना आकर्षित करतात.
हिवाळ्यात येथील पर्वत बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र चादरीने झाकले जातात, तर उन्हाळ्यात परिसर हिरवागार दिसतो.
येथील सुंदर लाकडी घरे, फुलांनी सजवलेल्या बाल्कनी आणि शांत रस्ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे भासतात.
ट्रेकिंग, पर्वतारोहण आणि निसर्गभ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे आहे.
निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक लाउटरब्रुनेनला भेट देतात.