संतोष कानडे
मुघल बादशहांच्या दिनचर्येबद्दल अनेकांना कुतूहल आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ते काय काय करायचे, याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना रस असतो.
झोपण्यापूर्वी अनेक मुघल सम्राट हात-पाय धुवून स्वच्छता करत असत, हे लोक स्वच्छतेला महत्व देत होते.
इस्लाम धर्माचे पालन करणारे सम्राट रात्रीची नमाज अदा करत असत. तेव्हाच ते झोपायला जायचे.
काही बादशहा धार्मिक ग्रंथांचे पठण किंवा विद्वानांचे वाचन ऐकत असत, त्यांच्या त्यांना छंद होता.
महत्त्वाचं म्हणजे, दिवसातील राजकीय घडामोडी आणि अहवालांचा आढावा घेतला जात असे.
रात्रीच्या वेळी राजवैद्यांच्या सल्ल्याने सुगंधी अत्तरांचा वापर केला जात असे. शाही कक्षांमध्ये अगरबत्ती किंवा सुगंधी धूप लावला जाई.
काही सम्राट संगीत किंवा काव्य ऐकून मन शांत करत असत. शयनकक्षातील सुरक्षा व्यवस्था तपासली जात असे.
मऊ गाद्या, रेशमी वस्त्रे आणि आलिशान बिछान्यांची व्यवस्था केली जाई. त्यानंतर बादशहा विश्रांतीसाठी शयनकक्षात जात असत.