संतोष कानडे
भारतात E85 इंधनाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आता पेट्रोलमध्ये ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरलं जाणार आहे.
तशा फ्लेक्स फ्यूलला सपोर्ट करणाऱ्या गाड्या बाजारात येऊ लागल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल येणार कुठून? हा प्रश्न आहे.
सध्या देशात इथेनॉल मुख्यतः ऊसाचा रस, मळी, मका आणि इतर धान्यांपासून तयार केलं जातं.
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अनेक नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन इथेनॉल उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच तांदूळ, ज्वारी आणि खराब झालेल्या धान्यांचाही वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जात आहे.
भविष्यात ऊसाच्या पाचटापासून, तांदळाच्या टरफलांपासून आणि कृषी अवशेषांपासून 2G इथेनॉल तयार करण्यावर भर जाणार आहे.
मात्र मोठ्या प्रमाणात E85 वापरायचे झाल्यास इथेनॉल उत्पादन क्षमता आणखी वाढवावी लागेल.
पाणी, शेतीची जमीन आणि अन्नधान्य पुरवठा यांच्यात संतुलन राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
मोठ्या प्रमाणावरील इथेनॉलसाठी शेवटी पारंपारिक संसाधनं कामी येणार आहेत, हे मात्र नक्की