Saisimran Ghashi
मुघल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या वंशजांनी भारताच्या विविध भागांमध्ये सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली.
इंग्रजांच्या भीतीमुळे त्यांना आपल्या जीवनाची चिंता होती. आज मुघलांचे वंशज भारतातील विविध शहरांमध्ये राहतात आणि सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन व्यतीत करतात.
सध्या भारतात मुघलांचे फक्त दोनच वंशज राहतात.
सुलताना बेगम ६० वर्षीय महिला भारताचे शेवटचे सम्राट बहादूर शाह जफर यांच्या पणती आहेत आणि शाही वारसा असूनही त्यांना गरिबीत जीवन जगावे लागत आहे.
सुलताना बेगम कोलकात्याच्या बाहेरील एका झोपडपट्टीत राहतात.
त्यांना मूलभूत पेन्शनवर उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा सहाव्या पिढीतील स्वयंघोषित वंशज आहे.
राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी हे मुघलांचे कायदेशीर वंशज आहेत. ते अमीर तैमूरचे २३ वे वंशज तर झहीरुद्दीन मोहम्मद बाबरचे १८ वे वंशज आणि बहादूर शाह जफरचे सहावे वंशज आहेत.
हे एक व्यावसायिक आहेत जे सध्या हैदराबादमधील कांचनबाग डिफेन्स परिसरात त्याच्या पत्नी आणि पाच मुलांसह राहतात.
थोडक्यात आता भारतात मुघलांचे वंशज संपत आले आहेत.