Saisimran Ghashi
मराठा साम्राज्यात पेशवे घराण्याचे महत्वाचे स्थान आहे. बाजीराव पेशवे, नानासाहेब, आणि राघोबाजी पेशवे हे महान योद्धे होते.
सध्या, पुण्यात पेशवे घराण्याचे दोन कुटुंबे आहेत. एक कुटुंब कृष्णराव पेशवे यांचे आहे, तर दुसरे कुटुंब डॉ. विनायक राव पेशवे यांचे आहे.
पेशव्यांचे वंशज आजही त्यांचा ऐतिहासिक वारसा जपत आहेत, पण त्यांच्याकडे कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता नाही. इंग्रजांनी त्यांची संपत्त्या जप्त केल्या होत्या.
पेशव्यांचे वंशज वाराणसीतील गणेश घाटावर असलेले गणपती मंदिर आणि अन्नछत्र याचे व्यवस्थापन करतात. हे मंदिर एक ट्रस्टद्वारे चालवले जाते, आणि या ट्रस्टमधून त्यांना काही आर्थिक लाभ मिळत नाही.
पेशव्यांचे नववे वंशज म्हणजे कृष्णराव पेशवे. कृष्णराव यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सून सुचेता आणि त्यांची नात पूजा यांचा समावेश आहे.
कृष्णराव पेशवे यांचे धाकटे बंधु डॉ. उदयसिंह उर्फ विनायक राव पेशवे यांच्या कुटुंबात पत्नी जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सून आरती आणि त्यांच्या मुली आहेत. डॉ. उदयसिंह यांनी पुणे विद्यापीठात भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून ३३ वर्षे काम केले. गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले.
पेशव्यांचे दहावे वंशज आहेत कृष्णराव पेशवे यांचे सुपुत्र महेंद्र पेशवे. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी महेंद्र यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंब पुण्यात प्रभात रोड भागात साधेपणाने राहतात.
महेंद्र यांची कन्या पेशव्यांची अकरावी वंशज पूजा या सध्या मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
पेशव्यांचे वंशज पुण्यातील शनिवारवाडा आणि पर्वती पेशवाईतील शौर्याचे प्रतीक असलेली अन्य ऐतिहासिक स्थळे आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करतात.
इंग्रजांनी पेशवे बाजीराव द्वितीय यांची संपत्ती जप्त केली आणि त्यांना उत्तर प्रदेशातील बिठूर येथे निर्वासित केले. पेशव्यांच्या कुटुंबांना ऐतिहासिक कष्ट आणि संघर्ष सहन करावा लागला, पण त्यांचे आदर्श आजही जिवंत आहेत.