सकाळ वृत्तसेवा
मुघल साम्राज्याच्या पतनावर इतिहासकारांनी विपूल लिखान केलेलं आहे. औरंगजेबनंतर मुघली साम्राज्य सांभाळणारा शक्तिशाली बादशहा झालाच नाही.
शाह आलम दुसरा हा गादीवर बसला तेव्हा मुघली साम्राज्य शेवटच्या घटका मोजत होतं. गुलाम कादिर नावाच्या एका अफगाणाने बादशहाला जेरीस आणलं होतं.
याच गुलाम कादिरने पुढे बादशहा शाह आलम दुसरा याचे डोळे फोडले होते. जो बादशहाला वाचण्यासाठी पुढे येई, त्याला तो कापून टाकत होता.
कितीतरी आठवडे दिल्लीमध्ये रक्तरंजित घडामोडी घडत होत्या. गुलाम अलीच्या क्रूरपणाचा शिकार मुघलांच्या महिलांही झाल्या होत्या.
हरममध्ये राहणाऱ्या महिला, बादशहाच्या बेगमा, मुली यांच्या इज्जती लुटल्या गेल्या. गुलाम कादिरने शहजाद्यांना मृत्यूची भीती दाखवून स्वतः समोर नाचण्यास भाग पाडलं.
गुलामने शाही परिवारातील महिलांचं कपडे उतरवले. राजरोस इज्जत लुटली जात असल्याने तेव्हा अनेक महिलांनी यमुना नदीमध्ये जीव दिला.
बादशहा शाह आलम दुसरा याच्या मदतीला महादजी शिंदे गेले होते. मराठ्यांनी गुलाम कादिरची हत्या केली.
मराठ्यांनी गुलाम कादिरचे डोळे आणि कान बादशहाला पाठवले. त्यानंतर मराठ्यांनीच दिल्लीची सत्ता चालवली, असा इतिहास आहे.
शाह आलम दुसरा याला मराठ्यांसोबत करार करावा लागला. २७ डिसेंबर १७७० रोजी हा ऐतिहासिक करार झाला. त्यानुसार सत्तेची सूत्र मराठ्यांकडे होती.