कापूर कशापासून तयार होतो?

संतोष कानडे

कापूर

कापूर हा पांढरा, स्फटिकासारखा आणि तीव्र सुगंध असलेला पदार्थ आहे.

नैसर्गिक

नैसर्गिक कापूर प्रामुख्याने Cinnamomum camphora या कापूर वृक्षापासून मिळतो.

लाकूड

या झाडाच्या लाकूड आणि पानांपासून मिळणाऱ्या तेलावर प्रक्रिया करून नैसर्गिक कापूर तयार केला जातो.

कृत्रिमरित्या

आज बाजारात मिळणारा बहुतांश कापूर मात्र औद्योगिक पद्धतीने कृत्रिमरित्या तयार केला जातो.

टर्पेन्टाइन तेल

कृत्रिम कापूर तयार करण्यासाठी प्रामुख्याने पाइन वृक्षांपासून मिळणाऱ्या टर्पेन्टाइन तेलातील संयुगांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो.

कापूर

कापूराचा उपयोग भारतात पूजा, आरती आणि धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

उडून जाणारा पदार्थ

कापूर हवेत सहज उडून जाणारा पदार्थ असल्यामुळे उघड्यावर ठेवला असता हळूहळू कमी होतो.

दहन

कापूर जाळल्यावर त्याचे दहन होते आणि त्याचा मोठा भाग वायूच्या स्वरूपात वातावरणात मिसळतो.

औषधी

कापूराचा उपयोग काही औषधी, सुगंधी पदार्थ आणि घरगुती उत्पादनांमध्येही केला जातो.

पाळीव प्राणी

मात्र कापूर खाणे धोकादायक असू शकते, त्यामुळे तो लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून नेहमी दूर ठेवावा.

डांबरगोळी नेमकी कशापासून तयार होते?

<strong>येथे क्लिक करा</strong>