Saisimran Ghashi
मुघल साम्राज्य सुमारे दोन शतके भारतात टिकले.
पण या इतिहासात एक असा प्रसंग आहे, जेथे एका मुघल सम्राटाचा जन्मच एका हिंदू राजाच्या राजवाड्यात झाला होता.
हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण खरंच त्या काळात एका हिंदू राजाने मुघल सम्राटाच्या कुटुंबाला आश्रय दिला होता.
मुघल सम्राट हुमायून शेरशाह सुरीकडून युद्ध हरले होते. पराभूत होऊन आपला जीव वाचवण्यासाठी पश्चिमेकडे, सध्याच्या सिंध भागात, पळून गेले.
या प्रवासात त्यांना हमीदा बानू बेगम नावाच्या स्त्रीची भेट झाली आणि त्यांच्यात विवाह झाला.
संकटाच्या काळात अमरकोटचे हिंदू शासक राणा प्रसाद यांनी या दांपत्याला आपल्या राजवाड्यात सुरक्षित आसरा दिला.
लग्नानंतर एक वर्षाच्या आत, १५४२ साली, त्या किल्ल्यात एका पुत्राचा जन्म झाला.
पुढे जाऊन, हाच मुलगा "अकबर" या नावाने संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला आणि मुघल साम्राज्याचा एक महान सम्राट ठरला.