संतोष कानडे
पहिला मुघल सम्राट बाबर हा चंगेज खान आणि तैमूरलंग यांचा वंशज होता, असं इतिहासकाकर म्हणतात.
हे मुघल मध्य आशियातल्या उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परिसरातून आलेले होते.
चंगेज खान हा मंगोलियाचा होता. त्याचा जन्म आधुनिक मंगोलियातल्या उत्तरी भागा असलेल्या ओनोन नदीच्या जवळ झाला होता.
तैमूरलंग यांचं मूळ गाव उझबेकिस्तानातल्या शाहरिसाब्जच्या जवळ असलेलं केश हे होतं. हे ठिकाम समरकंदपासून दक्षिण दिशेला ८० किलोमीटर दूर आहे.
समरकंद हे उझबेकिस्तानातलं दुसरं मोठं शहर आणि समरकंद हे राज्याच्या राजधानीचं ठिकाण आहे.
समरकंद हेच शहर तैमुरलंगच्या राजधानीचं शहर होतं. त्याची कबर इथेच आहे. हे एक मध्यवर्ती ठिकाण असून इस्लामी धर्मशिक्षणाचं केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं.
मुघलांचं निश्चित असं कोणतं गाव नाही. काही उझबेकिस्तान, काही ताजिकिस्तानातून आलेले होते.
ढोबळमानाने समरकंद हे मुघलांचं शहर म्हणता येऊ शकतं. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा उझबेकिस्तानातल्या फरगना घाटीतला होता.
चंगेज खानचा जन्म ३१ मे ११६२ रोजी झाला होता. तर तैमूरलंगचा जन्म ८ एप्रिल १३३६ रोजी झाला होता.