Saisimran Ghashi
मुघल प्रशासनात प्रत्येक अधिकारी आणि सैनिकाला "मनसबदार" म्हटले जात असे. प्रत्येक मनसबदाराची पदवी आणि जबाबदारी ठरवलेली असे.
मुघल साम्राज्यात मनसबदार म्हणून भारतीय मुस्लिम, अफगाण, राजपूत आणि मराठे अशा अनेक जातींच्या व्यक्तींना स्थान मिळालं होतं.
एका सामान्य मुघल सैनिकाला दरमहा 400 रुपये इतका पगार मिळत असे, जो त्या काळाच्या मानाने खूप मोठा रक्कम होती.
मुघल हरममध्ये सेवा करणाऱ्या दासींना दरमहा 1500 रुपये मिळत असत म्हणजे सैनिकांपेक्षा जवळपास चारपट जास्त.
अकबरच्या दरबारातील विदूषक व सल्लागार बिरबलला दरमहा 16,000 रुपये मिळत असत. त्याचा दर्जा आणि बुद्धिमत्ता यामुळे त्याला उच्च पगार दिला जात असे.
अकबरचा मुलगा आणि नंतरचा सम्राट जहांगीर (सलीम) याला दरमहा 700 चांदीची नाणी दिली जात, ही त्याच्या राजघराण्यातील स्थानाची ओळख होती.
प्रत्येक मनसबदाराची पदवी (उदाहरणार्थ, 5000 मनसब, 10000 मनसब इ.) त्याच्या पगाराचे प्रमाण ठरवत असे. जास्त मनसब असलेल्या व्यक्तीला अधिक पगार आणि जमीन मिळत असे.
त्या काळातील "पगार" आजच्या काळाच्या तुलनेत फार मोठा वाटतो, कारण तेव्हा 1 रुपयात बरेच काही विकत घेता येत होते त्यामुळे 1500 रुपये म्हणजे आजच्या लाखोंच्या समतुल्य.