सगळ्यात आधी मुघलांना माहिती होतं कच्चं तेल, असा व्हायचा वापर

संतोष कानडे

अमेरिका

लौकिक अर्थाने कच्च्या तेलाचा शोध १८५९ मध्ये अमेरिकेत लागला होता. मुघलांचा कार्यकाळ हा १५२६ ते १८५७ असा होता.

क्रूड आईल

क्रूड आईलची पहिली विहीर १८५९ मध्ये खोदली गेली. हा काळ मुघल साम्राज्याच्या अस्तानंतरचा आहे.

इराण

पण यापूर्वी इराक, इराण आणि म्यानमारमध्ये जमिनीच्या वरच्या थरामध्ये नैसर्गिकरित्या कच्चं तेल पाझरायचं.

मुघलांचे पूर्वज

मुघलांचे पूर्वज हे मध्य आशियातून आलेले होते. त्यामुळे त्यांना या तेलाबद्दल माहिती होती. मात्र फारसा उपयोग माहिती नव्हता.

तेल

जिथे नैसर्गिकरित्या तेल जमिनीवर यायचं तिथून ते उचलून ग्रीस म्हणून वंगण करण्यासाठी कच्च्या तेलाचा वापर होई.

वंगण

चाकांना वंगण लावण्यासाठी किंवा जहाजाचं लाकूड कुजू नये म्हणून लाकडाला डांबराप्रमाणे हे तेल फासण्यात येत असे.

नाफ्ता

मुघलांकडे नाफ्ता नावाचं एक ज्वालाग्राही द्रव्य होतं. हा नैसर्गिक तेलाचाच ऊर्ध्वपातीत प्रकार होता.

युद्ध

युद्धामध्ये शत्रूंवर गोळे फेकण्यासाठी किंवा बाणांच्या टोकाला आग लावण्यासाठी या नाफ्ताचा वापर होत असे.

पानिपत

बाबरने पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये ज्या तोफांचा वापर केला होता, त्यात इंधन म्हणून दारुगोळा होता.

भूगर्भामध्ये कच्चं तेल कसं तयार होतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>