सकाळ वृत्तसेवा
हरम हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. ज्याचा अर्थ पवित्र किंवा निषिद्ध असा होतो.
मुघलांच्या हरममध्ये महिलांचे अनेक गट होते. आतलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुंदर महिलांना आतमध्ये नेलं जायचं.
यातल्या काहीच महिला बादशहापर्यंत पोहोचू शकायच्या. काही महिलांना तर वर्षानुवर्षे बादशहाला बघूही शकायच्या नाहीत.
मुघल बादशहांना सुंदर महिला फार आवडायच्या. एकट्या अकबराच्या हरममध्ये पाच हजार महिला होत्या, असं म्हटलं जातं.
आपल्या हरममध्ये ते सुंदर आणि नृत्यकलेत तरबेज असलेल्या महिला असाव्यात, असा मुघलांचा हट्ट असायचा.
हरमध्ये सौंदर्यापेक्षा नृत्याला महत्त्व दिलं जाई. ज्या तरुणीला, महिलेला नृत्यकला अवगत होती, तिचं कौतुक व्हायचं.
मुघल बादशहा नृत्यामुळे आकर्षित व्हायचे, त्यामुळे त्यांना अशा महिलांचा कायमच शोध असायचा.
कनिजांमध्ये नृत्यांचे डाव रंगायचे. नृत्यप्रदर्शन एक जबाबदारीचं आणि हिंमतीचं काम असायचं. बादशहाला खूश करण्याची जोखीम असायची.
जी कनीज आपल्या नृत्याविष्काराने बादशहाचं मन जिंकायची तिला बादशहाच्या जवळ जाण्याची संधी मिळत असे.
मुघल बादशहांना सौंदर्यापेक्षाही नाचगाणं करणाऱ्या महिला जास्त आवडायच्या, हे इतिहासावरुन लक्षात येतं.