सकाळ डिजिटल टीम
भारतीय इतिहासात मुघल काळात अनेक कला, स्थापत्य आणि परंपरांचा विकास झाला. मात्र, याच काळातील काही गोष्टी आजही गूढ आणि वादग्रस्त मानल्या जातात. मुघल साम्राज्यातील 'हरम व्यवस्था' ही त्यापैकीच एक आहे.
Harem in Mughal Empire
esakal
मुघल साम्राज्यात हरम ही संकल्पना अत्यंत सामान्य होती, मात्र ते ठिकाण सर्वसामान्यांसाठी पूर्णतः निषिद्ध मानले जात असे.
Harem in Mughal Empire
esakal
सम्राट बाबरपासून ते शेवटचा मुघल सम्राट बहादुर शाह जफरपर्यंत हरममधील जीवनाबाबत नेहमीच चर्चा होत राहिली.
Harem in Mughal Empire
esakal
हरममध्ये प्रवेश करण्याचा अधिकार केवळ मुघल सम्राटालाच होता. त्याच्या सुरक्षेसाठी नपुंसकांची नियुक्ती करण्यात येत असे. हरम हे असे ठिकाण होते जिथे सम्राट महिलांसोबत विश्रांती घेत, संवाद साधत आणि मनोरंजन करत असत. नृत्य, संगीत, मद्यपान अशा विविध सुविधाही हरममध्ये उपलब्ध होत्या.
Harem in Mughal Empire
esakal
मात्र, हरमचे जीवन केवळ ऐश्वर्यापुरते मर्यादित नव्हते. हरममधील काही गोष्टी अत्यंत भयावह आणि रहस्यमय होत्या.
Harem in Mughal Empire
esakal
विशेषतः हरममधील विहिरी जनतेमध्ये भीतीचे कारण ठरल्या होत्या. असे मानले जात होते की एखाद्यावर गुन्हा सिद्ध झाला किंवा कट उघडकीस आला, तर संबंधित व्यक्तीला ठार मारून त्या विहिरीत फेकले जात असे.
Harem in Mughal Empire
esakal
इतकेच नव्हे तर मुघल हरमच्या तख्तखान्यात (तख्यघर) फाशीचा दोरखंडही असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. गुलामांवर किंवा दोषी ठरवलेल्या व्यक्तींवर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना तेथेच फाशी दिली जात असे.
Harem in Mughal Empire
esakal
या सर्व घटनांमुळे मुघल हरम केवळ ऐश्वर्याचे प्रतीक न राहता, सत्ता, भीती आणि क्रूर शिक्षेचेही प्रतीक बनले होते. आजही मुघल हरम आणि त्यातील रहस्ये इतिहासप्रेमींना आकर्षित करतात.
Harem in Mughal Empire
esakal
Crow Lifespan
esakal