संतोष कानडे
मुघलांच्या हरममध्ये एकदा टाकल्यानंतर महिलांचा बाहेरच्या जगाशी संबंध नसायचा. संपूर्ण आयुष्य त्यांना हरममध्येच घालवावं लागे.
जर महिलांना हरममधून बाहेर जायचं असेल तर एकच पर्याय होता. तो म्हणजे राजाचं मन जिंकणं. बादशहाचं मन एखाद्या महिलेवर बसलं तर तो तिला घेऊन बाहेरही जात असे.
महिलांना केवळ बादशहाचं मन जिंकावं लागत असे. मात्र ती महिला दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेऊ शकत नसे. त्यामुळे काही महिला महलामधल्याच लोकांसोबत संबंध ठेवीत.
महलातले अधिकारी, इतर लोक आणि जो आवडेल त्याच्याकडून हरममधल्या महिला शारीरिक भूक भागवायच्या.
हरममध्ये बादशहा आपले गुप्तहेत ठेवत असायचे. कुठलीही हालचाल थेट बादशहापर्यंत पोहोच व्हायची. हरममधल्या महिला स्वतःच्या आजाराबद्दल आणि कुणाच्या मृत्यूबद्दल चर्चा करु शकत नव्हत्या.
जर एखादी महिला आजारी पडली तर तिला बिमारखान्यात ठेवलं जायचं. जहाँगिरच्या हरममध्ये दुःखावर चर्चा करण्यास मनाई होती.
म्हणजे हरममध्ये राहणाऱ्या महिला आपल्या यातना, वेदना, दुःख बोलू शकत नव्हत्या. तेथे फक्त सुख, समाधान आणि आनंदाचं वातावरण राहावं, हा त्यामागचे हेतू होता.
Forbidden Tales of Harem and Butchery या पुस्तकामध्ये हरममधल्या महिलांच्या मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे.